भाजपची दिल्लीत बैठक, ‘या’ पक्षासोबतच्या युतीबाबत घेणार मोठा निर्णय ?

भाजपची दिल्लीत बैठक, ‘या’ पक्षासोबतच्या युतीबाबत घेणार मोठा निर्णय ?

नवी दिल्ली –  भाजपनं आज महत्त्वाची बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप कार्यालयात ही बैठक बोलावली असून या बैठकीत पीडीपीसोबतच्या युतीबाबात मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच जम्मू-कश्मीरमधील मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कश्मीरमधल्या परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान अमरनाथ यात्रा काही दिवसांतच सुरू होणार आहे, यावर्षी पुन्हा एकदा दहशतवादी या यात्रेवर हल्ला करण्याची शक्यता आहे. या शक्यतेने मोदी सरकार चिंतेत आहे.  जम्मू कश्मीरमधली  परिस्थिती अशीच राहिली तर तिथे राज्यपाल शासन लागू केलं जाऊ शकतं का? जर हा निर्णय घेतला गेला तर पीडीपीबरोबरचे संबंध कसे असतील याबाबतही चर्चा केली जाणार आहे. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जवान औरंगजेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्येमुळे मोदी सरकारवर देशभरातून टीकास्त्र केलं जात आहे. यावरही चर्चा केली जाणार आहे.

तसेच जम्मू कश्मीरमध्ये सर्व निर्णय केंद्र सरकार मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करुन घेत होतं. परंतु यापुढे केंद्र सरकार सर्व निर्ण भाजपचे मंत्री, आमदार यांना विश्वासात घेऊनच घेणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

 

COMMENTS