लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन, पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक !

लोकसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन, पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक !

नवी दिल्ली –  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून रणनीती आखण्यात आली असल्याची माहिती आहे. भाजपने आगामी निवडणुकीत मित्रपक्ष जोडण्यावर सर्वाधिक भर दिला असून मागील निवडणुकीत 16 घटकपक्ष होते तर येणाऱ्या निवडणुकीत 29 पक्ष आमच्या सोबत असतील, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हे घटकपक्ष कोणते याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

तसेच प्रत्येक मतदारसंघात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. त्याबाबत अजूनही चाचपणी सुरु आहे. 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची चर्चा होती. निवडणूक जिंकण्याची क्षमता असणाऱ्या सर्व उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबाबतही चर्चा झाली असून पंतप्रधान मोदी हे वाराणसी  हा मतदारसंघ कायम ठेवणार आहेत. तसेच ते दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून लढणार याबाबतची माहिती अजून कळू शकलेली नाही.

 

COMMENTS