प्रियांका गांधी फक्त दिसायला सुंदर, भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान !

प्रियांका गांधी फक्त दिसायला सुंदर, भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान !

नवी दिल्ली – भाजपचे मंत्र्यांनं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे. प्रियांका गांधी या फक्त दिसायला सुंदर आहेत पण केवळ दिसायला सुंदर असल्याने मतं मिळत नाहीत. त्यांच्याकडे राजकीय कर्तुत्व नसल्याचं बिहारमधील मंत्री व भाजप नेते विनोद नारायण झा यांनी म्हटले आहे.केवळ सुंदर चेहरा पाहून मतं मिळत नाही. शिवाय, त्या रॉबर्ट वद्रा यांच्या पत्नी आहेत. रॉबर्ट वद्रा यांच्यावर भूखंड घोटाळ्याबाबत आरोप आहेत. त्यामुळे प्रियांका यांच्याकडे राजकीय कर्तुत्व काहीच नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रियांका गांधी-वद्रा यांची काँग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना विनोद झा यांनी ही टीका केली आहे.

 

COMMENTS