उपमुख्यमंत्र्यांची या आमदाराची व्हिआयपी ट्रिटमेंट

उपमुख्यमंत्र्यांची या आमदाराची व्हिआयपी ट्रिटमेंट

सातारा – भाजपाचे १० पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगले होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमचे आमदार फोडून दाखवावे, असे आव्हान दिले होते. हेच आव्हान स्विकारून अजित पवार मात्र, एका आमदाराला व्हीआयपी ट्रिटमेंट देऊन राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची तयारी सुरू आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान, राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीनंतर काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापन करून सत्ता मिळली. या सरकारला एक वर्षे पूर्ण होत असताना भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य अजित पवार, जयंत पाटील यांनी केले होते. त्याबाबत भाजपच्या नेत्यांनी खिल्ली उडवली.

दरम्यान, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या असून भुसावळचे आमदार संजय सावकारे हाती घड्याळ बांधण्यास इच्छुक आहेत. तसेच सोलापूरचे आमदार कल्याण काळे हेही शरद पवार यांच्याशी जवळीक साधत असल्याचे पहावयास मिळत. तर तिसरेकडे साताऱ्यातील भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले विविध विकास कामांच्या निमित्ताने अजित पवार यांची वारंवार भेट घेत आहेत.

अजित पवारही कास धऱण आणि सातारा मेडिकल काॅलेजसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत. राष्ट्रवादीतील आमदारांपेक्षा भाजपच्या आमदाराला ऐवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची रणनिती किती यशस्वी होतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.

COMMENTS