“अमित साटम यांच्या अमोघ वाणीचे पारायण संघाच्या शाखेत व्हावे !”

“अमित साटम यांच्या अमोघ वाणीचे पारायण संघाच्या शाखेत व्हावे !”

मुंबई –  मुंबईतील भाजप आमदार अमित साटम यांनी एका अभियंत्याला शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी अमित साटम यांच्यावर जोरदारी टीका केली आहे. याबाबतचं ट्वीट सावंत यांनी केलं असून प्रसिद्ध प्रवचनकार भाजपाचे महान आ.अमित साटम यांच्या अमोघ वाणीने कान तृप्त झाले. या आधीही त्यांनी आपल्या महान वाणीने फेरीवाले व पोलिसांचे प्रबोधन केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा क्लीनचीटसहीत जाहीर सत्कार करावा व संघप्रार्थनेनंतर या वाणीचे पारायण परमनीतीमान संघाच्या शाखेत व्हावे असं त्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान अमित साटम यांनी अश्लिल भाषेत शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु अमित साटम यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले असून सुरुवातीचा आवाज माझा आहे. मात्र त्यानंतरचा आवाज माझा नसून तो एडीट करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तपासानंतर खरं काय ते उघड होईल परंतु विरोधकांकडून मात्र साटम यांच्यावर सध्या जोरदार टीकास्त्र सुरु असल्याचं दिसून येत आहे.

 

 

COMMENTS