निवडणूक आयोगाकडे अनिल गोटेंनी सादर केलेल्या संशयास्पद ध्वनीफीतीमुळे खळबळ !

निवडणूक आयोगाकडे अनिल गोटेंनी सादर केलेल्या संशयास्पद ध्वनीफीतीमुळे खळबळ !

धुळे – धुळ्यातील भाजपचे वादग्रस्त आमदार अनिल गोटे यांनी निवडणूक आयोगाकडे संशयास्पद ध्वनीफीत सादर केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह त्यांच्या स्विय सहायकांना जिल्हा बंदी करुन त्यांचे मोबाइल निगराणीत ठेवण्याची मागणीही अनिल गोटे यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान या तक्रारीची योग्य दखल न घेतल्यास ध्वनीफीत सार्वजनीक करण्याचा इशाराही आमदार अनिल गोटे यांनी दिला आहे. तसेच निवडणूक भयमुक्त होण्यासाठी आयोगाने दखल घेण्याची मागणीही गोटे यांनी केली आहे. अनिल गोटे यांनी केलेल्या या मागणीमुळे धुळे महापालिकेची निवडणूक वादग्रस्त होणार असल्याचं दिसत आहे.

आमदार अनिल गोटे यांनी धुळे महापालिका निवडणुकीत भाजपविरोधातच शड्डू ठोकला आहे. त्यांनी महापौर पदासाठी त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांना नवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर त्यांचे पुत्र तेजस गोटेदेखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये तुमची आवश्यकता आहे. त्यामुळे आपला राजीनामा मागे घ्यावा. तसेच महापौर पदासाठीदेखील उमेदवारी करू नये, असे आदेश दिल्याने राजीनामा मागे घेतल्याचेही आमदार गोटे यांनी सांगितले आहे.

COMMENTS