भाजप आमदार आशिष देशमुखांची विदर्भाच्या नावाने स्वतंत्र आघाडी ?

भाजप आमदार आशिष देशमुखांची विदर्भाच्या नावाने स्वतंत्र आघाडी ?

नागपूर – पक्षावर गेली अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. ते विदर्भाच्या नावाने स्वतंत्र आघाडी स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. आशिष देशमुख यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आणि उर्जामंत्री विदर्भाचे असतानाही विदर्भावर अन्याय होत असल्याचं ते म्हणाले आहेत. कटोल येथील नगरभवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून शेतक ऱ्यांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही तर राजीनामा तर देईनच परंतु वेळ पडली तर विदर्भाच्या नावाने स्वतंत्र आघाडी स्थापन केली जाईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असंही देशमुख म्हणाले आहेत. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भाची दुर्दशा केली. विदर्भात निर्माण होणारी वीज मुंबई, पुणे, कोकणात जाते, मात्र विदर्भात शेतक ऱ्यांना पुरेशी वीज मिळत नाही. परिणामी पिकाचे नुकसान होऊन शेतकरी आत्महत्या करीत आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे असल्यामुळे त्यांच्याकडून विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र शेतक ऱ्यांचा भ्रमनिरास झाला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

 

COMMENTS