भाजप आमदाराच्या भावाला सायबर गुन्हेगारांचा झटका, क्रेडिट कार्डवर लाखोंचा गंडा !

भाजप आमदाराच्या भावाला सायबर गुन्हेगारांचा झटका, क्रेडिट कार्डवर लाखोंचा गंडा !

पिंपरी चिंचवड –  भाजप आमदाराच्या भावाला सायबर गुन्हेगारांनी झटका दिला असून क्रेडीट कार्डवर लाखोंचा गंडा घातला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधुना सायबर गुन्हेगारांनी झटका दिला आहे. त्यांच्या भावाच्या अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवरून 4 लाख 26 हजार रुपये परस्पर लंपास करण्यात आले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS