भाजपला मोठा धक्का, आणखी एका आमदारानं घेतला राजीनाम्याचा निर्णय !

भाजपला मोठा धक्का, आणखी एका आमदारानं घेतला राजीनाम्याचा निर्णय !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या आमदारानं पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात असूनही भाजपवर नेहमीच जोरदार टीका करणारे आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 19 नोव्हेंबरला राजीनामा देणार असल्याचं अनिल गोटे यांनी जाहीर केलं असल्याची माहिती आहे. अनिल गोटे यांच्या या निर्णयामुळे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.

दरम्यान रविवारी अनिल गोटे यांनी धुळे येथील शिवतीर्थ चौकातील मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. तसेच यावेळी बोलत असताना त्यांनी धुळ्याच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. पक्षाने आपल्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं असल्यामुळे आपण महापौरपदाच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं जाहीर सभा घेतली होती. या सभेसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन शहराचे आमदार अनिल गोटे यांचा फोटो वगळण्यात आला होता. त्यामुळे अनिल गोटे यांनी भाजपर जोरदार टीका केली.

त्यानंतर त्यांनी आज आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. अनिल गोटे यांच्या या निर्णयामुळे आगामी धुळे महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS