नाईक कुटुंब पक्षात येत असल्याने भाजप आमदार नाराज?

नाईक कुटुंब पक्षात येत असल्याने भाजप आमदार नाराज?

नवी मुंबई – नवी मुंबईमधील राष्ट्रवादी नेते गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक यांचा भाजप पक्ष प्रवेश होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेतली आहे. मंदा म्हात्रे यांच्याबरोबर चव्हाण यांनी एक तास चर्चा केली आहे. नाईक कुटुंब भाजपमध्ये येत असल्याने समजूत काढण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी मंदा म्हात्रे यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करत नाईकांवर टीका केली. नाईक हे स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत. ही त्यांची स्टंटबाजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते नक्कीच न्याय देतील, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, म्हात्रेंची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न असून भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रेंची भेट घेतली आहे. तसंच यासंदर्भात म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत मुख्यमंत्र्यांंनी म्हात्रे यांची समजूत काढली आहे.

COMMENTS