सोलापूरच्या भाजप खासदाराची जीभ घसरली, नागरिकांनी भाषण थांबवलं !

सोलापूरच्या भाजप खासदाराची जीभ घसरली, नागरिकांनी भाषण थांबवलं !

सोलापूर – सोलापूरमधील भाजप खासदाराची जीभ घसरल्याचं पहावयास मिळालं आहे. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांना तात्काळ त्यांचं भाषण थांबवावं लागलं. भाजप खासदार शरद बनसोडेंवर ही वेळ आली. त्यांच्या कन्नड गावाता एका डॉक्टरांच्या एकसष्टीच्या कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्यांनी आपला अनुभव सांगितला.  ‘मी आठवीत असताना गुप्तांग खालीवर झालेल्या’ घटनेचा त्यांनी किस्सा सांगितला. या किस्स्यामुळे एकसष्टीच्या कार्यक्रमातील महिला आणि ग्रामस्थांनी भाषण थांबवण्याची मागणी केली. तसेच विद्यमान काँग्रेस आमदारांनी माईकचा ताबा घेतला.

भाजप खासदार शरद बनसोडे

दरम्यान या कार्यक्रमाला माजी खासदार सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित होते.विशेष म्हणजे शरद बनसोडे यांच्या जन्मगावातच हा प्रकार घडला असून गावकऱ्यांच्या रोषानंतर खासदार महाशयांना आपले भाषण थांबवावे लागले आहे. त्यामुळे त्यांना आपला अनुभव सांगणं चांगलंच महागात पडलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS