पुढील चार महिन्यात भाजपचे आमदार महाविकास आघाडीत

पुढील चार महिन्यात भाजपचे आमदार महाविकास आघाडीत

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. अवघ्या सहा महिन्यात हे सरकार पडेल, असा दावा विरोधकांनी केला होता. मात्र, आता पाहा पुढील चार महिन्यात भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या गोटात सामील होतील’, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय धुराळा उडवून दिला आहे.

पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांनी विविध पक्षातील आमदारांना अमिष दाखवून आपल्या पक्षात घेतले. मात्र, मागील वर्षी शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. पुढील चार महिन्यात मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार महाविकास आघाडी सरकारमधील पक्षात प्रवेश करतील. अशा आमदारांनी राजीनामा दिल्यास त्यांना काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष पाठिंबा देतील, असे पवार यांनी सांगितले.

 

 

COMMENTS