नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात भाजप आमदाराचा मृत्यू!

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात भाजप आमदाराचा मृत्यू!

नवी दिल्ली – नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात भाजप आमदाराचा मृत्यू झाला असून छत्तीसगढमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात भाजपाच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तसेच या हल्ल्यात पाच सुरक्षारक्षक जखमी झाले असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. यानंतर जवानांनी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली. तरीही दंतेवाडा या ठिकाणी हा हल्ला झाला आहे.


COMMENTS