भाजपला धक्का, ‘या’ आमदारानं घेतली शरद पवारांची भेट!

भाजपला धक्का, ‘या’ आमदारानं घेतली शरद पवारांची भेट!

मुंबई – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेलेले काही आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला गेल्याने, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.जयकुमार गोरे यांनी शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काही दिवसापूर्वी जयकुमार गोरे यांनी भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट का घेतली हे अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान भाजपचे काही आमदार आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. त्यानंतर अशातच आता गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS