मुख्यमंत्र्यांवरील विश्वास उडाला, योग्य वेळी राजीनामा देणार –भाजप आमदार

मुख्यमंत्र्यांवरील विश्वास उडाला, योग्य वेळी राजीनामा देणार –भाजप आमदार

चंद्रपूर – वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य  भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केलं आहे. आशिष देशमुख यांची ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ चंद्रपुरात पोहचली आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे.

दरम्यान आशिष देशमुख यांच्या आत्मबळ यात्रेचं स्वागत विरोधी पक्षातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे.  ‘मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना त्यांनी ७ वेळा विधानसभेत वेगळा विदर्भ विषय मांडला आहे. ४ वर्षे आधी मुख्यमंत्र्यांमध्ये असलेली विदर्भाविषयीची तळमळ आता दिसत नाही. वेगळ्या विदर्भाबाबतच्या आपल्या पत्राला त्यांनी अद्याप उत्तर दिलेलं नसून आपला त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असून भाजपमधील अनेक आमदार अस्वस्थ असल्याने ही खडखड येत्या काळात प्रकर्षाने पुढे येणार असल्याचे संकेतही देशमुख यांनी वर्तवले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS