भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, “संघाच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत !”

भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, “संघाच्या शाखेत न जाणारे हिंदू नाहीत !”

हैदराबाद – भाजपा आमदारानं पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत न जाणारी लोकं हिंदू नाहीत असं वक्तव्य भाजचे आमदार टी राजा सिंह यांनी केलं आहे. टी राजा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. नीमचजवळ हिंदू उत्सव समितीने धर्म सभेचे आयोजन केलं होते. या सभेत संबोधित करताना राजा म्हणाले, प्रत्येक हिंदूने संघाच्या शाखेत गेलेच पाहिजे. शाखा या देशाच्या हितासाठी काम करतात. शाखेत सहभागी होणारी व्यक्ती ही देशाच्या आणि धर्माच्या हितासाठी काम करते. त्यामुळे जे शाखेत जात नाहीत, ते हिंदूच नाहीत असं टी राजा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हिंदू कोण आहे आणि कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. असा सवाल काँग्रेसचे नेते रमेश राजोरा यांनी केलं आहे. हिंदू कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला तो हिंदू हे सिद्ध करण्यासाठी संघाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचंही राजोरा यांनी म्हटलं आहे.

COMMENTS