भाजप आमदार राम कदम यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, जितेंद्र आव्हाड यांची जोरदार टीका ! VIDEO

भाजप आमदार राम कदम यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, जितेंद्र आव्हाड यांची जोरदार टीका ! VIDEO

मुंबई – महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेले भाजपचे आमदार राम कदम हे आणखी वादाच्या भोव-यात अडकण्याची शक्यता आहे. कारण राम कदम यांनी नवीन मतदारांना नाव नोंदणीनंतर खास ऑफर दिली आहे. कदम यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत त्यांनी १८ वर्षावरील युवकांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच महागड्या आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरायचं असेल, तिरूपतीला दर्शनासाठी जायचं असेल किंवा मग हिंदी चित्रपटसृष्टीच्या कलाकारांसह फोटो काढायचे असल्यास मतदार यादीत नाव नोंदवा आणि माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा असं राम कदम यांनी म्हटलं आहे. पाहा राम कदम काय म्हणालेत ते….

तसेच मतदार यादीत नाव नोंदवल्यास सिनेमाचं चित्रीकरण पाहाणं आणि कार चालवणं शिकवण्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी या व्हिडीओद्वारे दिली आहे. तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी हे करत असल्याचे कदम यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. कदम यांच्या या आवाहनावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम कदम यांच्यावर टीका केली आहे. भाजपा आमदार राम कदम यांचा नवीन प्रताप..तुम्ही नवीन मतदार नोदणी करा व माझ्या कार्यालयाला कळवा…तिरूपती यात्रा , लोकप्रिय अभिनेत्यांसोबत फोटो काढून देणार , महागड्या गाड्या मध्ये फिरवणार, तसेच आमिष मतदारांना मतदार होण्यासाठी मग निवडुन येण्यासाठी अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

 

COMMENTS