भाजपचा आमदार म्हणतोय घड्याळाला मतदान करा!

भाजपचा आमदार म्हणतोय घड्याळाला मतदान करा!

पंढरपूर – भाजपच्या आमदारानं चक्क घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा प्रचार करताना भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन सभेत सूचक वक्तव्य केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले असल्याचे दिसत आहेत.

खेडभाळवणी येथील सभेत परिचारक यांनी माझा मार्ग ठरलाय फडणवीस, मोदी, दिल्ली. तुमचा मार्ग ठरवा लोकशाही आहे. तुम्हाला परवानगी आहे कुणाला मदत करायची ते करा असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर करोळे येथील सभेत ज्यांना माझ्यासोबत यायचंय त्यांनी घड्याळाला मतदान करा असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर तेथील लोकांनी कमळ म्हटल्यावर परिचारक लगेचच कमळ असं म्हणाले.

परिचारक यांच्या दोन्ही सभेतील या वक्तव्यामुळे ते नेमका कोणाचा प्रचार करत आहेत. अशी चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.

COMMENTS