भाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

भाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

नाशिक – भाजपला मोठा धक्का बसला असून विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहेत. नाशिकमधील भाजपाचे आमदार डॉ. अपूर्व हिरे हे पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अपूर्व हिरेंसह माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, आणि त्यांचे समर्थक उद्या नाशिकमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.  त्यामुळे भाजपातून राष्ट्रवादीत घरवापसी सुरु झाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हिरे कुटुंबातील संघर्ष मिटल्यानंतर अपूर्व हिरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या इतर दिग्गज नेत्यांनाही घरवापसीचे वेध लागले असल्याचं दिसत आहे. मात्र ११ डिसेंबरला पाच राज्यांच्या निकालाची हवा पाहून इतर नेते घरवापसीबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ११ डिसेंबरला पाच राज्यांच्या निकालावर राज्यातील राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत.

COMMENTS