‘या’ जिल्ह्यातील असलेला भाजपचा एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर?

‘या’ जिल्ह्यातील असलेला भाजपचा एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर?

नांदेड –  काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत जात असतानाच भाजपचाच आमदार शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. नांदेडचे एकमेव भाजपचे आमदार असलेले तुषार राठोड आता शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार राठोड यांनी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे राठोड शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान डॉ. तुषार राठोड हे नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. २०१५ साली झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. तुषार राठोड हे ४७ हजार २४८ मतांनी विजयी झाले होते. आगामी विधानसभा निवडणूकही ते भाजपकडूनच लढणार असल्याची चर्चा होती. परंतु राठोड यांना नांदेडमध्ये आलेल्या आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला वेगळं वळण लागलं आहे. परंतु शिवसेना-भाजप युती असल्याने मी आदित्य ठाकरे यांच्या भेटीला शासकीय विश्रामगृह येथे गेलो होतो, पण ही सदिच्छा भेट होती असं राठोड यांनी म्हटलं आहे.

COMMENTS