‘पप्पू’ कोण आणि खरा ‘फेकू’ कोण ?, भाजप खासदाराचा पंतप्रधान मोदींना सवाल !

‘पप्पू’ कोण आणि खरा ‘फेकू’ कोण ?, भाजप खासदाराचा पंतप्रधान मोदींना सवाल !

नवी दिल्ली – मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांसह भाजपच्या काही नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले जात आहे. ‘पप्पू’ कोण आहे आणि खरा ‘फेकू’ कोण बनले, हे साहेब आपण सांगाल का? असा सवाल भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी यांनी केला आहे. सिन्हा यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. आमच्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपला करिष्मा लोकांना दाखवून दिला. जर टाळी कर्णधाराला मिळत असेल तर मग शिव्याही त्यालाच मिळाव्यात असंही सिन्हा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपकडून वारंवार ‘पप्पू’ म्हटले जात होते. त्यावर आज शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटवरून सांगितले, ‘पप्पू’ कोण आहे आणि खरा ‘फेकू’ कोण आहे, हे साहेब आपण मला सांगाल का? आमच्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपला करिष्मा लोकांना दाखवून दिला असल्याचं ट्वीट सिन्हा यांनी केलं आहे.

COMMENTS