‘या’ भाजप खासदाराला शिवसेनेकडून उमेदवारी ?

‘या’ भाजप खासदाराला शिवसेनेकडून उमेदवारी ?

मुंबई –  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप खासदाराला शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पालघरच्या जागेसाठी शिवसेनेने हट्ट धरला असून शिवसेनेने श्रीनिवास वनगांसाठी ही जागा मागितली होती. परंतु वनगा यांना उमेदवारी देण्याऐवजी आता शिवसेनेकडून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे वनगा यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे काही महिन्यापूर्वीच पालघमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपने काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांचा विजय झाला.

परंतु आगामी निवडणुकीसाठी आता गावित यांना शिवसेनेनं ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर गावित यांना बहुजन विकास आघाडीकडूनही ऑफर आली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे गावित काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS