हे अराजक नाही, तर काय आहे ?, भाजप खासदाराचा घरचा आहेर !

हे अराजक नाही, तर काय आहे ?, भाजप खासदाराचा घरचा आहेर !

लखनऊ – ‘दलितांसाठी वंदनीय असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याच्या घटना देशभरात घडत आहेत. मात्र पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.त्यामुळे हे अराजक नाही, तर काय आहे?,’ असा सवाल भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी मोदी सरकारला केला आहे. फक्त मीच नाही, तर सर्वोच्च न्यायालयातील वकीलदेखील हेच म्हणत असल्याचंही फुले यांनी म्हटलं आहे. तसेच मोदी सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला आहे. हाच धागा पकडून उत्तर प्रदेशमधील खासदार असलेल्या सावित्रीबाई यांनी स्वत:च्या पक्षावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान देशाचं संविधान, आरक्षण संपल्यास फक्त बहुजन समाजच नव्हे, तर संपूर्ण देशातील लोकांचे अधिकार संपुष्टात येतील असंही खासदार सावित्रीबाई फुले यांनी म्हटलं आहे. तसेच मोहम्मद अली जिना यांच्या छायाचित्रावरुन झालेल्या वादातही सावित्रीबाई फुले यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. भाजपाचे नेते मोहम्मद अली जिना यांच्याविरोधात विधानं करत असताना फुले यांनी जिना यांचं कौतुक केलं होतं. जिना हे महापुरुष होते आणि कायम राहतील, असं त्यांनी म्हटलं होतं. यावरुन भाजप खासदार सावित्रीबाई फुले या पक्षाच्या विरोधात उतरल्या असल्याचं दिसत आहे.

COMMENTS