…तर मी बंडखोर आहे, भाजपा खासदारानं मोदींविरोधात थोपटले दंड!

…तर मी बंडखोर आहे, भाजपा खासदारानं मोदींविरोधात थोपटले दंड!

नवी दिल्ली – भाजप खासदारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आणि भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला सुनावले आहे. कोलकाता येथे सुरु असलेल्या विरोधकांच्या महारॅलीतीलत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा हे लवकरच भाजप सोडतील असं दिसत आहे.

दरम्यान पटत नसेल तर भाजपामधून निघा असं वक्तव्य
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केलं होतं. त्यानंतर सिन्हा यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
कोलकाता या ठिकाणी ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली मोदी सरकार आणि भाजपाविरोधात महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीत २२ पक्षांच्या नेत्यांची हजेरी आहे. याच मंचावर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही हजेरी लावली आहे. खरं बोलणं ही बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असे म्हणत मी सत्याची कास धरली आहे ती सोडू शकत नाही असं सिन्हा यांनी म्हटले आहे.

COMMENTS