‘हे’ सीबीआय-अधिकाऱ्यांमधील युद्ध नाही, सरकारकडून राफेल प्रकरण झाकण्याचा प्रयत्न, भाजप खासदाराचा घरचा आहेर !

‘हे’ सीबीआय-अधिकाऱ्यांमधील युद्ध नाही, सरकारकडून राफेल प्रकरण झाकण्याचा प्रयत्न, भाजप खासदाराचा घरचा आहेर !

नवी दिल्ली – ‘हे सीबीआय-अधिकाऱ्यांमधील युद्ध नसून सरकारकडून राफेल प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यानंच केला आहे. भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी हे विधान केलं विधान केलं आहे. तसेच आज जर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जिवंत असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. तसेच आपण पक्ष सोडणार नसून हवं असेल तर पक्षाने मला बाहेरचा रस्ता दाखवावा असंही यावेळी शत्रूघ्न सिन्हांनी म्हटलं आहे.

तसेच सीबीआयवरुन सुरु असलेल्या गदारोळावरही शत्रुघ्न सिन्हा यांनी भाष्य करत आपण विरोधी पक्षांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. सरकारने तपास यंत्रणेला संपवलं असून ‘हे सीबीआय अधिकाऱ्यांमधील युद्ध नसून, राफेलसारखं काहीतरी झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी भाजपवरच केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी तसेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा आपल्याला प्रेरणा देते, ‘आपल्या ग्रंथांमध्ये रावणासहित सर्वांकडून शिकलं पाहिजे अशी शिकवण देण्यात आली असल्याचं सिन्हा यांनी म्हटलं आहे. तसेच पक्षासोबत आपले संबंध थोडे कटू असल्याची कबुलीही शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे.

अटलजींच्या कार्यकाळात आपण लोकशाही कार्यकाळाचा आनंद घेतला.परंतु सध्या हुकूमशाही सुरु असून कोणतीही माहिती न देता नोटाबंदीसारखे निर्णय केंव्हाही घेतले जातात असा आरोपही यावेळी सिन्हा यांनी केला आहे.

COMMENTS