राज्यातील भाजपचा एक खासदार कमी होणार, ‘या’ नेत्याची खासदारकी धोक्यात ?

राज्यातील भाजपचा एक खासदार कमी होणार, ‘या’ नेत्याची खासदारकी धोक्यात ?

सोलापूर – महाराष्ट्रातील भाजपच्या
23 खासदारांपैकी एक खासदार कमी होणार असल्याचं दिसत आहे. कारण सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सादर केलेलं बेड जंगम जातीचं प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार करण्यात आली होती. यावर न्यायालयात सुनावणी झाली.या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले आहेत. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला आहे.

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामींच्या ज्या मूळ कागदपत्रांबाबत तक्रादाराने आक्षेप घेतला होता, ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्या अर्जावर सुनावणी झाली असून आता अंतिम निर्णय तक्रादारांना पोस्टाने कळवण्यात येणार आहे. त्यामुळे महास्वामींची खासदारकी धोक्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे 23 खासदार निवडून आले आहेत. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. परंतु जात प्रमाणपत्रामुळे त्यांची खासदारकी आता धोक्यात आली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS