भाजपला धक्का, विद्यमान खासदार काँग्रेसच्या वाटेवर!

भाजपला धक्का, विद्यमान खासदार काँग्रेसच्या वाटेवर!

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला असून भाजपाचे बिहारमधील पाटणा साहिबचे खासदार आणि भाजप नेते, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते 28 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटणा साहिबमधून शत्रुघ्न सिन्हा यांच्याऐवजी भाजपने विद्यमान मंत्री रवीशंकर प्रसाद यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे त्यांनी  काँग्रेसमध्ये जाण्याच्या निर्णय घेतला आहे.

दरम्यान 2014 ला मोदी सरकार आल्यापासूनच शत्रुघ्न सिन्हांनी अनेकदा पक्षाविरोधातच जाहीर वक्तव्य केली होती. शिवाय ते विरोधकांच्या व्यासपीठावरही दिसले होते. राफेल व्यवहाराविषयी त्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज होते. याच पार्श्वभूमीवर सिन्हा यांना आगामी निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट दिलं नसल्याची चर्चा आहे.

COMMENTS