भाजपला मोठा धक्का, आणखी एक विद्यमान खासदार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश ?

भाजपला मोठा धक्का, आणखी एक विद्यमान खासदार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश ?

नवी दिल्ली –  आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपचे खासदार आणि राहुल गांधी यांचे चुलत भाऊ असलेले वरुण गांधी हे काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. वरुण गांधी हे गेली काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज आहेत. पक्षात फारसं महत्त्व  दिलं जात नसल्यामुळे त्यांची नाराजी वाढली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान लखनऊमध्ये 10 फेब्रुवारीला काँग्रेसची मोठी रॅली आहे. या रॅलीला प्रियांका गांधी या पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत. यादरम्यानच वरुण गांधीही या रॅलीमध्ये  उपस्थित राहणार असून ते काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

वरुण गांधी जर काँग्रेसमध्ये आले तर उत्तर प्रदेशात त्याचा फायदा होऊ शकतो असं राहुल गांधी यांना वाटतं आहे. त्यामुळे वरुण गांधी यांना पक्षात घेण्यासाठी राहुल गांधी देखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. वरुण गांधी यांनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS