भाजप, राष्ट्रवादीला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांसह ‘या’ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

भाजप, राष्ट्रवादीला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांसह ‘या’ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते व एन्काउंटर फेम माजी पोलीस अधिकारी रवींद्र आंग्रे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनी देखील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे.

दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच रवींद्र आंग्रे आणि मुनाफ हकीम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे. परंतु भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मात्र मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS