मुख्यमंत्रीपदाऐवजी भाजपकडून शिवसेनेला ‘ही’ मोठी ऑफर!

मुख्यमंत्रीपदाऐवजी भाजपकडून शिवसेनेला ‘ही’ मोठी ऑफर!

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतु शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसली आहे. त्यामुळे भाजपनं शिवसेनेपुढे आता एक मोठी ऑफर ठेवली अससल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच केंद्रात एक वाढीव कॅबिनेट मंत्रीपदाबरोबरच राज्यातील महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्याची तयारीही भाजपनं दर्शवली असल्याची माहिती आहे. यात अर्थमंत्री, कृषीमंत्री, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ असंही भाजपनं म्हटलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. शिवसेनेला 5 वर्षांसाठी स्वत:कडे मुख्यमंत्रीपद असावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज होणारी बैठक शिवसेनेनं रद्द केली.मुख्यमंत्री पदाच्या बोलणीसाठी आज दुपारी 4 वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेकडून सुभाष देसाई, संजय राऊत आणि भाजपकडून भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेने बोलणी थांबवली आहे.

त्यामुळे आता भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच केंद्रात एक वाढीव कॅबिनेट मंत्रीपदाबरोबरच राज्यातील महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्याची तयारीही भाजपनं दर्शवली असल्याची माहिती आहे. यात अर्थमंत्री, कृषीमंत्री, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ असंही भाजपनं म्हटलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपची ही ऑफर शिवसेना मान्य करणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS