मुख्यमंत्रीपद नाही पण…, भाजपचा शिवसेनेला नवा प्रस्ताव!

मुख्यमंत्रीपद नाही पण…, भाजपचा शिवसेनेला नवा प्रस्ताव!

मुंबई – मुख्यमंत्रीपदावरुन भाजप-शिवसेनेमध्ये अजूनही रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे तर भाजपही मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. आता भाजपनं शिसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रिपद नाही, परंतु सुकाणू समितीचं अध्यक्षपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवण्याचा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना आता भाजपचा हा प्रस्ताव मान्य करणार का हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून बसलेली आहे. मुख्यमंत्रिपदासह सर्व पदं आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप ही शिवसेनेची मागणी कायम आहे. मात्र त्यावर उतारा म्हणून सुकाणू समितीचं अध्यक्षपद टेकवून शिवसेनेची बोळवण करण्याचा भाजपचा इरादा आहे. त्यामुळे आता शिवसेनेची भूमिका कायम राहणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS