कोट्याधीश जादूगार’ भाजपचा राज ठाकरेंवर जोरदार निशाणा !

कोट्याधीश जादूगार’ भाजपचा राज ठाकरेंवर जोरदार निशाणा !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाजपानं व्यंगचित्राद्वारे निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या कोहिनूर मिल घोटाळ्याप्रकरणी त्यांना ‘कोट्याधीश जादूगार’ म्हणत भाजपनं टि्वट केलं आहे. अरे काल मी जादूचे प्रयोग बघितले. त्या जादुगाराने 2 रुपयाचं नाणं एका रिकाम्या डब्यात ठेवलं आणि दोन सेकंदात त्या नाण्याची 2000 रुपयाची नोट झालेली दिसली. आम्ही बघतच राहिलो रे! छ्या…त्यात काय मोठं! ह्याला काय जादू म्हनतात होय…आपल्या कृष्णकुंजवरच्या सायबांनी एकही रुपया न टाकता 20 कोटी काढून दाखवले. असं म्हणत भाजपानं कार्टून काढून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित केलं आहे. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व विभागात मनसे आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे. पण निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्याआधीच भाजपने राज ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. व्यंगचित्राद्वारे भाजपान त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे याला आता कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

COMMENTS