मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा ‘बी’ प्लॅन तयार,  शिवसेनेचे 15 ते 16 आमदार भाजपच्या संपर्कात ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा ‘बी’ प्लॅन तयार, शिवसेनेचे 15 ते 16 आमदार भाजपच्या संपर्कात ?

मुंबई – विधानसभा निवडणुकीत युतीचा 161 जागांवर विजय झाला आहे. भाजपचे 105 तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे शिवसेना व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. परंतु शिवसेना मात्र मुख्यमंत्रीपद आणि 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसल्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेना जर या फर्म्युलेयावर अडून बसली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेलाच धक्का देण्याची तयारी सुरु केली असल्याची माहिती आहे. शिवसेनेला धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बी’ प्लॅन तयार केला असून, शिवसेनेचे 15-16 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान शिवसेनेनं आपली मागणी मान्य न केल्यास आघाडीसोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही आपला ‘बी’ प्लॅन तयार करून ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून तीन-चार वेळा निवडून आल्यानंतरही मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांचा एक गट फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे मंत्रिपदासाठी शिवसेनेचे आमदार भाजपमध्ये जाणार का हो पाहण गरजेचं आहे.

COMMENTS