सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे,  विरोधी पक्षाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल !

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, विरोधी पक्षाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल !

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं ट्वीट केलं आहे.

आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर न घेणे दुर्दैवी आहे. सुशांतसिंह च्या परिवाराला न्याय मिळेल आणि ठाकरे सरकारची दादागिरी संपेल” असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

सर्वसामान्य जनतेच्या मनात सुशांतसिंह प्रकरणासंदर्भात शंका कुशंका होत्या आणि त्यामुळेच सीबीआय चौकशीची अपेक्षा होती ती सन्माननीय कोर्टाने मान्यता दिली. त्यामुळे दूध का दूध पानी का पानी हे या प्रकरणात होईल असं मत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.

 

COMMENTS