…तर ती शपथ होत नाही, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर भाजपचा आक्षेप!

…तर ती शपथ होत नाही, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर भाजपचा आक्षेप!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीवर भाजपनं आक्षेप घेतला आहे. शपथ ही शपथ असते. ती त्या फॉर्मेटमध्ये घ्यावी लागते. जर ती त्या फॉर्मेटमध्ये घेतली नाही तर ती शपथ होत नाही. अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.तसेच नवीन सरकारने शपथ घेतल्यापासून विधानसभेचे, विधानमंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसवायल सुरु केले आहेत. राज्यपालांनी हंगामी अध्यक्ष निवडला असताना नियमांमध्ये तरतूद आहे की नवीन अध्यक्ष येईपर्यंत हंगामी अध्यक्ष तेच राहतात परंतु नियम धाब्यावर बसवून ते बदलण्यात आले असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान आतापर्यंत अध्यक्ष सुरुवातीला निवडला जातो, त्यानंतर विश्वासदर्शक ठराव होतो. मात्र आता विश्वासदर्शक ठराव आज ठरवला जाणार आहे. त्यानंतर उद्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल.kतसेच प्रथा परंपरेनुसार किंवा कायद्यानुसार विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक ही गुप्त मतदानाने होते असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या या आरोपांवर आता महाविकासआघाडी काय उत्तर देणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS