शिवसेनेच्या ‘त्या’ मागणीला भाजपचा विरोध !

शिवसेनेच्या ‘त्या’ मागणीला भाजपचा विरोध !

मुंबई – लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी शिवसेनेच्या एका मागणीला भाजपनं विरोध केला आहे. देशभरात सार्वजनिक ठिकाणी बुरखा बंदी करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेच्या या मागणीला भाजपाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विरोध केला आहे. भारतात बुरखा बंदी करण्याची गरज नसल्याचं नरसिम्हा राव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जीव्हीएल नरसिम्हा राव यांच्याबरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीवर विरोध दर्शवली आहे. बुरखा घालणाऱ्या सर्व महिला दहशतवादी नसतात असं आठवले यांनी म्हटलं आहे.

तसेच शिया वक्त बोर्डाचे चेअरमन वसीन रिझवी यांनीही शिवसेनेच्या बुरखा बंदीच्या मागणीला विरोध केला आहे. ही बेजबाबदार आणि असंवैधानिक मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच बुरखा घालायचा की नाही हा निर्णय मुस्लिम महिलांवर सोडला पाहिजे असही वसीन रिझवी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS