राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपला ग्रामीण भागातही धक्का !

राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपला ग्रामीण भागातही धक्का !

मुंबई – राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपला आता ग्रामीण भागातही धक्का बसत आहे. अमरावतीमधील पंचायत समिती निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, त्याचप्रमाणे तिवसा येथे पंचायत समितीचा निकाल जाहीर झाला. या पंचायत समितीमध्ये काँग्रेसनं बाजी मारली आहो. यशोमती ठाकूर यांच्या तिवसा पंचायत समितीमध्ये 6 जागांवर काँग्रेस पक्षाने विजय मिळविला आहे. त्यामुळे याठिकाणी तिवसा पंचायत समितीवरही काँग्रेसचाच झेंडा फडकणार आहे.

दरम्यान धामणगाव पंचायत समितीमध्ये देखील 8 जागांपैकी 6 जागांवर काँग्रेस तर फक्त 2 जागांवर भाजपला विजय मिळविता आल्याने काँग्रेस पक्षाची सत्ता याठिकाणी स्थापन होणार आहे. परंतु चांदूर रेल्वे पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. चांदूर रेल्वेत 6 जागांपैकी 4 जागा भाजपाने जिकंल्या आहेत. तर दोन जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्यामुळे तिवसा तालुक्यात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर तर धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वेत भाजप आमदार प्रताप अडसुळ आणि काँग्रेस माजी आमदार विरेंद्र जगताप यांचे वर्चस्व पहावयास मिळाले आहे.

COMMENTS