…त्यानंतर मी नव्याने सुरुवात करणार, गणेश चतुर्थीच्या दिवशी पंकजा मुंडेंची मोठी घोषणा!

…त्यानंतर मी नव्याने सुरुवात करणार, गणेश चतुर्थीच्या दिवशी पंकजा मुंडेंची मोठी घोषणा!

मुंबई – राज्यासह देशभरात आज बाप्पाचं आगमन झालं. अनेक नागरिकांनी आपल्या घरात गणरायाची प्रतिष्ठापना आपल्या घरात केली. राजकीय नेत्यांच्या घरात देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरात देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पंकजा मुंडेंनी मोठी घोषणा केली आहे. मी विदेशात जाणार आहे. विदेशातून परतल्यानंतर तसेच कोरोना संकट दूर झाल्यावर पुन्हा एकदा पूर्वीच्या झंझावाताप्रमाणे, ताकदीने समाजाच्या सेवेसाठी उतरणार असल्याचा निश्चय पंकजा मुंडे यांनी गणपतीपुढे केला आहे.फेसबुक पोस्टद्वारे बऱ्याच कालावधीनंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात काही दिवस जाणार आहे. त्यानंतर नव्याने सुरुवात करणार असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केली आहे.

COMMENTS