भाजपने आम्हाला गृहीत धरू नये, समता परिषदेच्या इशाय्रामुळे पंकजा मुंडे संतापल्या !

भाजपने आम्हाला गृहीत धरू नये, समता परिषदेच्या इशाय्रामुळे पंकजा मुंडे संतापल्या !

बीड- भाजपने आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा पंकजा मुंडे यांच्यासमोरच सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव काळे यांनी दिला आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी भाजपला मदत केली. पण, गेल्या चार वर्षात त्यांना काहीही मिळाले नाही. तेव्हा कल्याण आखाडेंनी सांगितले तर हे सरकार पाडू, अशी बंडाची भाषाही डॉ. राजीव काळे यांनी केली आहे. यावेळी पंकजा आणि प्रितम या दोन्ही मुंडे भगिनी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

दरम्यान न्याय मिळत नसेल तर वेगळी वाट निवडा, असे आवाहनच काळे यांनी संघटनेच्या अध्यक्षाला भर सभेत केले. माळी समाज २०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या पाठीशी उभा राहिला. पण, या साडेचार वर्षात माळी समाजाला आणि सावता परिषदेला काय दिले, असा प्रश्न राजीव काळे यांनी पंकजा मुंडेंना भर सभेत विचारला आहे. बीड जिल्ह्यातील दोन मतदारसंघात माळी समाजाचे मतदान निर्णायक आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला गृहीत धरू नये असा उघड इशाराच काळे यांनी दिला आहे. यानंतर कल्याण आखाडे यांनी सावरासावर केली.

पंकजा मुंडे संतापल्या

यावेळी संतापलेल्या मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या की, जिल्हास्तरावरच्या कार्यकर्त्याने राज्यातील सरकार पाडण्याची भाषा करायची नसते. मी कधीही सावता परिषदेच्या कल्याण आखाडे यांना डावललेले नाही. येणाऱ्या काळात सबंध महाराष्ट्रातील माळी समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने भाषण करताना आपले भान ठेवावे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS