परळीचे वैद्यनाथ देवस्थान आता संपूर्ण भारताशी ‘कनेक्ट’, पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांना यश !

परळीचे वैद्यनाथ देवस्थान आता संपूर्ण भारताशी ‘कनेक्ट’, पंकजा मुंडे, खा. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नांना यश !

बीड, परळी – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथाचे देवस्थान आता संपूर्ण भारताशी ‘कनेक्ट’ झाले असून देवस्थानचा समावेश रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळांमध्ये झाला आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी केलेल्या मागणी व प्रयत्नांना यामुळे यश मिळाले आहे, दरम्यान परळीत फटाके फोडून प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

परळी रेल्वे स्थानकाला बारा ज्योर्तिलिंगांशी ‘दर्शन’ रेल्वेद्वारे जोडण्याची मागणी राज्याच्या ग्रामविकास व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती.खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी या मागणीचा सतत पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पंकजा मुंडे व खा.प्रितम मुंडे मागणीची दखल घेऊन परळी रेल्वे स्थानकाचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थक्षेत्रांच्या यादीत समावेश केला असून तसे पत्र खासदार डाॅ प्रितम मुंडे यांना पाठवले आहे.

परळीत फटाके फोडून स्वागत

पर्यटन व तीर्थक्षेत्रांना एकमेकांशी जोडणाऱ्या रेल्वेच्या पर्यटन मंडळामध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ देवस्थानचा समावेश व्हावा यासाठी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात प्रश्न उपस्थित करताना रेल्वेच्या तीर्थक्षेत्रांच्या यादीत परळी रेल्वे स्थानकाचा समावेश करावा अशी मागणी केली होती तसेच पंकजा मुंडे यांच्या मार्फत पाठपुरावाही केला होता.
रेल्वे स्थानकाचा रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थक्षेत्र स्थळांमध्ये समावेश झाल्याने प्रवाशांत आनंद व्यक्त होत आहे. बाहेरील पर्यटकांची संख्या वाढून शहराची बाजारपेठ यामुळे वाढणार आहे. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील ठिक ठिकाणी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले आहे. याप्रसंगी खासदार डाॅ प्रितम मुंडे यांच्यासह भाजपचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS