भाजपचा शिवसेनेपुढे नवा फॉर्म्युला, युती होणार ?

भाजपचा शिवसेनेपुढे नवा फॉर्म्युला, युती होणार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यासाठी भाजपनं आता शिवसेनेपुढे नवा फॉर्म्युला ठेवला असल्याची माहिती आहे. यामध्ये गेल्यावेळेपेक्षा शिवसेनेला एक जागा वाढवून देण्याची तयारी भाजपने दर्शविली असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत युती होईल असा विश्वासही सूत्रांनी वर्तवला आहे.

दरम्यान २०१४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने २६ जागा लढविल्या होत्या. तर शिवसेनेने राज्यातील २२ जागा लढविल्या होत्या. पण यावेळी शिवसेनेला गेल्यावेळेपेक्षा एक जागा जास्त देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. त्यामुळे युती झाली तर भाजप २५ जागा तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे.

दरम्यान भाजपशी युती व्हावी, यासाठी शिवसेनेचे खासदार आग्रही आहेत. युती झाली नाही तर मतांची विभागणी होईल आणि त्याचा निवडणुकीत फटका बसेल. त्यामुळे भाजपशी युती करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार करत आहेत. आता भाजपच्या या नव्या फॉर्म्युल्यावर शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं गरजेचं आहे.

 

COMMENTS