रावसाहेब दानवेंनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब ?

रावसाहेब दानवेंनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब ?

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात पक्षाची जबाबदारी अन्य कोणाकडे द्यावी, यासाठी पंतप्रधान मोदींना भेटलो, त्यांना विनंती केली त्यानंतर आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपने १८ राज्य जिंकले. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी सरकार आणि पक्षाचा समन्वय साधला. भाजप महाराष्ट्रात पहिल्या क्रमाकांचा पक्ष आहे. २०१९ च्या निवडणूकीत पाचव्यांदा लोकसभेत निवडून आलो. एक व्यक्ती एक पद अशी तरतूद असल्यामुळे आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दानवे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षपद दुसय्रा नेत्याला दिलं जाणार असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर दानवे यांनी राजीनामा दिला असून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राज्यातील अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती होणार आहे. लवकर त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली जाणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे पाटील यांच्याकडील मंत्रिपद कायम ठेवत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS