काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड, भाजपचं राज्य सरकारविरोधात आंदोलन !

काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड, भाजपचं राज्य सरकारविरोधात आंदोलन !

मुंबई – महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप आंदोलन करणार आहे. मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव’ अशा प्रकारची भूमिका घेऊन 22 मे रोजी भारतीय जनता पार्टी ठाकरे सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.22 तारखेला मेरा अंगण मेरा रणागंण महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आपल्याला आपल्या घरासमोर सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून राज्य सरकारचा निषेध करावा. यावेळी निषेध व्यक्त करणारं रिप्लेक्शन म्हणून काळे बोर्ड, काळे टी शर्ट, काळी रीबीन, काळे मास्क, काळे शर्ट, काळ्या ओढण्या अशा गोष्टींचा वापर करावा असं पाटील यांनी म्हटलं आहे.

हातावर पोट असणाऱ्यांना सरकारने पॅकेज घोषित केले पाहिजे. आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही. या सर्व गोष्टी घेऊन आपण 22 तारखेला आपल्या घरासमोर उभे राहून निषेध करा, असंही चंद्रकांट पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोरोना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात पहिला कोरोना रुग्ण 9 मार्चला सापडला. त्याच दिवशी केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला. केरळाची संख्या 70 दिवसात 1 हजार क्रॉस झालेली आहे आणि महाराष्ट्रातील 70 दिवसाची संख्या ही 40 हजार झाली आहे. केरळमध्ये मृतांची संख्या 12 क्रॉस झालेली नाही. पण महाराष्ट्रातली मृत्यूची संख्या 1300 क्रॉस होऊन 1400 कडे जात आहे. त्यामुळे ठाकरे सरकार कोरोनीला रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

COMMENTS