राज्यसभेसाठी भाजपची 11 उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्यांना संधी!

राज्यसभेसाठी भाजपची 11 उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्यांना संधी!

नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.मित्र पक्षांच्या दोन उमेदवारांसह एकूण ११ जणांची नावं यात असून नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचंही नाव आहे. तसेच या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये असाममधून भुवनेश्वर कालीता, बिहारमधून विवेक ठाकूर, गुजरातमधून अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा, झारखंडमधून दीपक प्रकाश, मणिपूरमधून लिएसेंबा महाराजा, मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य शिंदे, हर्ष सिंह चौहान, राजस्थानमधून राजेंद्र गहलोत यांचा समावेश आहे.

26 मार्चला राज्यसभा निवडणूक

देशभारतील राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्चला मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी म्हणजे 26 मार्चला संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर होईल. महाराष्ट्रातील 7 जागांचाही यामध्ये समावेश आहे. एकूण 17 राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील 55 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.

COMMENTS