खडसे सासरे-सूनचे वाद?

खडसे सासरे-सूनचे वाद?

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना वारंवार डावलेले जात असल्याने त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे अद्यापही भाजपमध्ये आहेत. त्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारही त्या अजूनही राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. मात्र, त्यांच्यासमोर वारंवार एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. तो म्हणजे तुम्ही कधी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, या आज रक्षा खडसे यांनी उत्तर दिले असून माझ्या भूमिकेबाबत अनेकांच्या मनात शंका असली तरी कुठल्याही परिस्थितीत मी पक्ष सोडणार नाही व भाजपातच राहणार असल्याचे आश्वस्त केले. त्यानिमित्ताने खडसे सासरे-सूनेत वाद आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. तसेच राष्ट्रवादीने काॅंग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार आणले. त्यामुळे दररोज भाजप आणि राष्ट्रवादीचा संघर्ष पाहवयास मिळत आहे. दोन्ही पक्षाचे एकामेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

भाजपकडून पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान बूथ संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी सोमवारी ब्राम्हण सभेत भाजप जिल्हा ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भाजपचे विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका असून या निवडणुकांमध्ये रावेर मतदार संघात भाजपाचेच वर्चस्व राहणार आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन देखील खासदार खडसे यांनी केले. एकनाथ खडसे देखील राजकीय आस्तित्व सिद्ध करण्यासाठी आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढविण्याच्या प्रयत्न करतील. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त जागा एकनाथ खडसे यांच्या गटाला म्हणजे राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. दुसरीकडे खासदार रक्षा खडसे यांनी मतदारसंघ भाजपमय करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार केल्याने रावेर मतदासंघात सासरे विरुद्ध सून असा संघर्ष निर्माण होणार आहे.

COMMENTS