राज ठाकरेंना भाजपकडून व्यंगचित्रद्वारे प्रत्युत्तर !

राज ठाकरेंना भाजपकडून व्यंगचित्रद्वारे प्रत्युत्तर !

मुंबई मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. गेली अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे व्यंगचित्राद्वारे भाजपवर जोरदार निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनंही राज ठाकरे यांच्यावर व्यंगचित्र काढलं आहे. या व्यंगचित्रातून राज यांच्यावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. भाजपने आपल्या ‘महाराष्ट्र भाजपा’ या टि्वटर अकाऊंटवर एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं असून या व्यंगचित्रात राज ठाकरे हे व्यंगचित्र काढण्यात मग्न असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते दाखवण्यात आले आहे.

या व्यंगचित्रात मनसेचे कार्यकर्ते हे राज ठाकरे यांना “साहेब,लोकसभा निवडणूक जवळ आली” अशी आठवण करुन देत आहेत. परंतु राज ठाकरे हे स्वतःचं व्यंगचित्र काढण्यातच मग्न असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसेच यामध्ये “साहेब,आपल्याला एकही जागा जिंकता आली नाही” असं कार्यकर्ते म्हणताना दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपनं त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS