ब्रेकिंग न्यूज – भाजपच्या ज्येष्ठ नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल !

ब्रेकिंग न्यूज – भाजपच्या ज्येष्ठ नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल !

रत्नागिरी-  भाजपचे ज्येष्‍ठ नेते आणि म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांच्याविरोधात चिपळून पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शैक्षणिक संस्थेतील महिला कर्मचा-याला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मधु चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सन 2002 ते 2017 सालामध्ये विविध ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. चिपळूण कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा  केला असल्याची माहिती आहे.

या घटनेतील पिडीत महिलेने यापूर्वी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे वारंवार तक्रार अर्ज केले होते. २००२ पासून पिडीत महिलेचे शोषण सुरू होते. शैक्षणिक संस्थेच्या अधिकारांचा गैरवापर करून हा प्रकार सुरू झाला. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार पिडीत महिलेवर बलात्कार करण्यात आला. या विरोधात महिलेने वारंवार लेखी तक्रारीही केल्या. मात्र या तक्रारीची दखल घेतली  गेली नाही. सत्ताधारी पक्षातीलच एका बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप होत असल्याने पोलिसांनी चौकशीचा फार्स सुरु ठेवला होता. अनेक तक्रार अर्ज करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर त्या पिडीत महिलेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

या पिडीत महिलेची फसवणूक झाल्यानंतर त्या महिलेने चिपळूण न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत भाजपचे प्रवक्ते आणि मुंबई म्हाडाचे अध्यक्ष माजी आमदार मधु चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूण न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर साºयांचेच धाबे दणाणले. चिपळूण न्यायालयाच्या आदेशाविरोधात मधु चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र उच्च न्यायालयाने चिपळूण न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवताना अपील फेटाळून लावले. यानंतर मधु चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु झाली.

चिपळूण न्यायालयाने भाजपचे प्रवक्ते व मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३७६, ३५४, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश चिपळूण पोलिसांना दिले. १५६/३ प्रमाणे न्यायालयाच्या आदेशानुसार चिपळूण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण राज्यात खळबळ उडवणारी ही घटना असून हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याबाबतची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठी वरिष्ठ स्तरावरुन खास आदेश बजावण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तास या प्रकाराबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेतल्यानंतर या प्रकारावर शिक्कामोर्तब झाला. भाजपच्या एका बड्या नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी मंत्रालस्तरावरुन प्रयत्न झाल्याची चर्चा सुरु आहे. तसेच राज्यातील भाजपच्या सर्वोच्च नेत्याने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरु आहे.

दरम्यान मधू चव्हाण यांनी महिलेचा आरोप फेटाळला असून संबंधित महिला वारंवार माझ्याविरोधात तक्रार देत आहे. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

COMMENTS