शिवसेना -भाजपमधील जागावाटपाचा तिढा कायम, भाजपचा ‘हा’ फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य!

शिवसेना -भाजपमधील जागावाटपाचा तिढा कायम, भाजपचा ‘हा’ फॉर्म्युला शिवसेनेला अमान्य!

मुंबई – शिवसेना -भाजपाचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. गणेशोत्सव संपेपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम करण्याचा चंग भाजपाने बांधला होता. मात्र शिवसेना ही 135 – 135 जागावाटपच्या मुद्द्यावर ठाम आहे. तर भाजप 174 आणि 114 शिवसेना असा भाजपाने प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला आहे. मात्र हा फॉर्म्युला सेनेला मान्य नाही. त्यामुळे जागावाटपाची बोलणी सध्या बंद झाली असून आता कोंडी कशी फुटते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी युती होणार की नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा भाजपाने नमतं घेतलं होतं, मुख्यमंत्री मातोश्रीची पायरी चढले होते. प्रत्यक्ष जागावाटप करतांना भाजपाने स्वतःच्या कोट्यातील एक जागाही (पालघर) शिवसेनेला दिली होती.

तसेच गेल्या रविवारी झालेल्या मेट्रो भूमीपूजनाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचेच सरकार येणार असल्याचा दावा केला होता. भाजपचे नेतेही युती होणार असाच सूर लावत आहेत. मात्र अजून जागावाटपचे गणित मात्र सुटू शकलेले नाही.तेव्हा आता कोण एक पाऊल मागे घेतो, कसा मध्य मार्ग काढला जातो यावरूनच युतीचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.त्यातच मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा आजपासून सुरू होत असून 19 तारखेपर्यंत सुरू रहाणार असल्याने पुढील काही दिवस तरी युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता नाही.

COMMENTS