भाजपला मोठा धक्का, विद्यमान नाराज खासदार बदलणार पक्ष ?

भाजपला मोठा धक्का, विद्यमान नाराज खासदार बदलणार पक्ष ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. पालघरमधील भाजप खासदार राजेंद्र गावित हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. गावित हे बहुजन विकास आघाडीमध्ये जाणार असल्याचं बोललं जात चर्चा आहे.

दरम्यान दिवंगत चितामन वनगा यांच्या निधनानंतर काँग्रेसमधून राजेंद्र गावित हे भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी भाजपनं गावित यांना उमेदवारी दिली होती. तर उमेदवारी न मिळाल्यामुळे दिवंगत चिंतामन वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा हे शिवसेनेमध्ये गेले होते. परंतु आता ही जागा भाजपने शिवसेनेला दिली आहे. त्यामुळे नाराज असलेले भाजप खासदार राजेंद्र गावित हे पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS