विदर्भातील पहिल्या टप्प्यात युतीला दोन तगड्या बंडखोरांची डोकेदुखी !

विदर्भातील पहिल्या टप्प्यात युतीला दोन तगड्या बंडखोरांची डोकेदुखी !

नागपूर – विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात येत्या 11 एप्रिलला मतदान होणार आहे. या सात पैकी दोन लोकसभा मतदारसंघात युतीमध्ये बंडखोरी झाली आहे. भंडारा गोंदिया आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघात युतीला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र पटले यांनी बंडखोरी केली आहे. तर यवतमाळ वाशिम मतदारसंघातून भाजपाचे पी बी आडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपनं सुनिल फुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेले भाजपच्या किसान मोर्चाचे उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी बंडखोरी केली आहे. फुंडे हे कुणबी आहेत. तर राजेंद्र पटले हे पोवार समाजाचे आहेत. या मतदारसंघात पोवार समाजाची लक्षणिय मते आहेत. त्यामुळे ती मते पटले यांच्याकडे वळू शकतात. त्याचा फटका भाजप उमेदवार सुनिल फुंडे यांना बसू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसनं या मतदारसंघातून नाना पंचबुधे यांना रिंगणात उतरवलं आहे.

यवमाळ वाशिम मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. विद्यमान खासदार भावना गवळी यांनाच शिवेसनेनं पुन्हा संधी दिली आहे. गेल्यावेळी युती तुटल्यानंतर तिथून भाजपाचे पी बी आडे हे गेली पाच वर्ष लोकसभा निवडणुकीची तयारी करत होते. हा मतदारसंघ भाजपसाठी घ्यावा अशी त्यांची मागणी होती. पण तसं झालं नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. आडे हे बंजारा समाजाचे आहेत. मतदारसंघात बंजारा समाजाची मोठी संख्या आहे. त्यातच शिवसेनेतला एक गट आणि भाजपातील काही नेते आडे यांना आतून मदत करु शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे या दोन बंडखोरांचा युतीच्या उमेदवारांना सामना करावा लागणार आहे. हे दोन्ही बंडखोर निकालावर किती परिणाम करतात हे निकालातच दिसून येईल.

COMMENTS